गुरु

Started by smadye, September 06, 2015, 01:18:39 AM

Previous topic - Next topic

smadye

     गुरु

गुरु हा असतो कसा
असे तो स्वच्छ आरिसा
जसा लोखंडासी परिसा
किवा मलिन मनास उजळणारा सुवासा

गुरु म्हणजे मृदुल काया
आपणास घडविण्यास धडपडणारी काया
कधी कठीण होऊनी दगडाचाहि घडविते भक्कम पाया
कधी प्रेमाची उधळण करणारी ती माया

स्वच्छ आणि निरपेक्ष असा त्याचा स्वभाव
मार्ग दाखवुनी अलिप्त राहणे हा त्याचा भाव
संकटात घेते आत्मियतेने धाव
कळकळ उद्धारण्याची हे एकच त्यास ठाव

असा गुरूचा महिमा काय तो मी वर्णावा
शब्द जिथे पडतात थिटे कसा असेल वाणीला ओलावा
तरी मनापासून आभार माझ्या देवाला
असा एक गुरु मजसी गवसला

                  सौ सुप्रिया समीर मडये