वाटतं होतं मला तिची माझी भेट घडेलं काय...

Started by prasad_bhegade, September 08, 2015, 10:11:25 AM

Previous topic - Next topic

prasad_bhegade

वाटतं होतं मला
तिची माझी भेट घडेलं काय...
एकदा निवांत भेटून
मनोसोक्त गप्पा मारता येईल काय...
ती असेल अन् मी असेल
बाकी दुसरं कुणी नसेल...
ती निसर्गाकडे पाहत असेल
अन् मी तिच्याकडे पाहत असेल...
दोघांच्या मनात
एकच विचार येत असेल...   
कोण बोलण्यास सुरुवात करतयं
ह्यानेच मन खचत असेल...
ह्या शांत अशा एकांतात
कोणीच काही बोलेना,
मग मीच बोललो तिला
'ऐ, ऐक ना...!'
अर्धवट शब्दांची सुरुवात
पूर्ण करणार तरी कोण ?
हळूच आवाजात ती बोलली
'हा आता बोल!'
                 
जिचा आवाज ऐकण्यासाठी
माझे कान आसुसलेले होते,
तो सुमुधुर आवाज ऐकताच
माझ्या हृदयाचे ठोके चुकले होते...
अशाच गोड स्वरात
आमची चालली होती गम्मत,
सूर्यही मावळला
हीच निसर्गाने केली आमची जम्मत...
ह्याच सायंकाळी
धरला तिचा हातात हात,
पाऊल काय उचलेना
तरीही चालू लागलो घराची वाट...!

- प्रसाद भेगडे.