==* भृणहत्या *==

Started by SHASHIKANT SHANDILE, September 08, 2015, 11:49:01 AM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

जन्म घेऊ द्याना तीला
का बरं असं करता
नाजुकश्या या कळीला
का कोमेजुन मारता

हसु द्याना खेळू द्याना
तिलापण जगु द्याना
सुंदर अशी धरती
तिलापण बघू द्याना

नाव करेल जगात
मान वाकणार नाही
अहो लक्ष्मीचं रूप ते
ती सतावणार नाही

जोपासून सारी स्वप्न
सांभाळून जगेल ती
अहो तुमच्या घराला
घरपण देईल ती

मुलगा हवा म्हणून
मुलींना का मारायचे
भ्रुणहत्या करुन हे
जीवन संपवायचे

जागे व्हा रे शहाण्यांनो
कुठल्या युगी जगता
निसर्गाचे नियम हे
कशाला तरी तोड़ता

नरनारी दोन्ही हवे
आनंदी संसारासाठी
घरातच स्वर्गलोक
घडवूया दोघांसाठी

सांगा मला खरं सांगा
भ्रूणहत्या का करता
मुलगा आणि मुलगी
असा का भेद करता

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनि:-9975995450
दि.06/09/2015
Its Just My Word's

शब्द माझे!