🙏शिक्षक 🙏

Started by abhishek panchal, September 08, 2015, 01:43:21 PM

Previous topic - Next topic

abhishek panchal

                     शिक्षक

पुस्तक हातात धरून काही सार्थ होत नाही ,
त्यासाठी पुस्तक वाचायला शिकले पाहिजे

सुख नुसत वाचून मिळणार नाही ,
त्यासाठी त्याचा अर्थ शोधायला शिकले पाहिजे

सुख शोधन्यात आयुष्य व्यर्थ घालवण्यापेक्षा ,
आहे त्या क्षणात सुख शोधायला शिकले पाहिजे .

जमत नाही म्हणून माणसे तोडण्यापेक्षा ,
आहेत त्या माणसांशी जुळवून घ्यायला शिकले पाहिजे .

वाईट आठवणींना कवटाळुन बसण्यापेक्षा ,
चांगल्या आठवणी द्यायला शिकले पाहिजे .

मरणाकडे डोळे लाऊन वाट बघत बसण्यापेक्षा ,
एक क्षण सुखाने जगायला शिकले पाहिजे .

जीवनाला अंत आहे , पण शिक्षण कधीही संपत नाही .

मरेपर्यंत सारे विद्यार्थी असतात , पूर्ण ज्ञानी कोणीही होत नाही .

शिक्षकांची यादी मोठी असते ,त्यात आयुष्य कधी येऊन बसले , हे ही कोणाला कळत नाही .

आयुष्य हेच मोठे शिक्षक असले , तरी कोणी कोणाची जागा घेऊ शकत नाही .

जीवनात प्रत्येक शिक्षकाचे एक अमूल्य असे स्थान असते , त्यांचा सदा आदर ठेवायला शिकले पाहिजे .

प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असतो .

चांगला विद्यार्थी चांगला देश घडवतो , अन् हा असा एक चांगला विद्यार्थी एक शिक्षक घडवतो .

साऱ्या शिक्षकांना साष्टांग नमस्कार
🙏🙏🙏🙏
😊😊


                                                                        - अभिषेक पांचाळ