आज खूप रडावस वाटलं.....

Started by Radha Phulwade, September 08, 2015, 03:42:46 PM

Previous topic - Next topic

Radha Phulwade

का कुणास ठाऊक
आज खूप रडावस वाटलं
दुखं  सारं  मनातच दाटलं
तुझ्याशी खुप  बोलाव वाटल
पण सार काही मनातच साठलं.......... 
वीण खोलून वाटे सारं
काही तुझ्यापाशी उघडावं 
पण मन सांगे सार
काही मनातच दडावं..........
तू समोर असतानाही
सांग ना रे असं का घडावं.... 
तू समोर असता
माझे कायमच असे मौन
तुझ्या माझ्या प्रेमाचा विषय
सोडून सारे काही गौण ..........
आता वाटे पुन्हा यावी ती कातरवेळ
न पुन्हा घडुनी यावा आपल्या संगतीचा मेळ!!!

                                      ---- राधा

Mandar Gadkari

खूपच सुंदर..अगदी मनाला चटका लावलास


shailesh@26b


shrikant.pohare