बदलय जग

Started by Ravi Padekar, September 08, 2015, 04:55:07 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

बदलय जग,
म्हणून बदलल्या काही कृती
आता तरी जपा,
आपल्या महाराष्ट्राची संस्कृती

पूर्वी होते काही संस्कार
मुलगी सातच्या आत घरात
पण आता रात्र झालिया पार
अजून मुलगी नाही दारात

पूर्वी होते काही संगोपन
मातीत खेळून गेले बालपण
मोबाइल गेम मुळे,
आता न दिसे शहाणपण
विसरून गेले मातीतले कण कण

पूर्वी होते विचार सगुण
पदर पडे न खांद्यावरून
आता उरलेत कुठे गुण
वेड फॅशनचे लागून

म्हणूनच बदलय जग
पण बदलून देऊ नका अशा गोष्टी
चांगली ठेवा दृष्टी
तरच दिसेल सुंदर सृष्टी....!!

                                     कवि:- रवि सुदाम पाडेकर
                                           - ८४५४८४३०३४.