कधी कळणार प्रेम म्हणजे काय?

Started by Ravi Padekar, September 10, 2015, 12:00:37 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

आज कालच्या मुलींना
कधी कळणार प्रेम म्हणजे काय?
आपण केले हाय
तर ते करतात बाय...

शॉपिंग साठी आपल्या समोर,
करतील पैशाची ती हाव,
आपण सोबत असल्यावर,
करणार नाही महाग वस्तूंचे ते भाव
आज कालच्या मुलींना
कधी कळणार प्रेम म्हणजे काय?

प्रेमासाठी मुलगा पाहिजे 
त्यांना हाय फाय,
सूट बूट घालणारा आणि त्यावरती टाय,
आपण कितीही झुरलो त्यांच्यासाठी तर,
निघतील दुसर्‍या वळणावर त्यांचे पाय,
आज कालच्या मुलींना
कधी कळणार प्रेम म्हणजे काय?

गाडीचे चाक बदलावे 
असे बदलतील ते बॉय,
लाइफ मध्ये हवं
फक्त त्यांना एन्जॉय,
आपल्या वर प्रेम करणार्‍यांच
त्यांना काय देन-घेण नाय,
आज कालच्या मुलींना
कधी कळणार प्रेम म्हणजे काय?

आधी सांगतील आपल्याला,
माझं तुझ्यावर खूप प्रेम हाय,
आपल्याला घेऊन दुनिये भर
मिरवतील काय?
खिसा खाली झाल्यावर
करतील लांबूनच बाय...

आज कालच्या मुलींना
कधी कळणार प्रेम म्हणजे काय?
आपण केले हाय
तर ते करतात बाय...!!!

                                     कवि :- रवि सुदाम पाडेकर
                                               घाटकोपर,मुंबई
                                           मो.- ८४५४८४३०३४