चार खांद्यावर लोक तुला...

Started by dattarajp, September 10, 2015, 04:54:04 PM

Previous topic - Next topic

dattarajp

चार खांद्यावर लोक तुला...

चार खांद्यावर लोक
तुला सजवून न्हेत होते.
खांदा बदलत ते मला
हे सांगत होते.

तू कायमच हरवलीस 
का ते मला म्हणत होते.
पण मला ते खर वाटत नव्हते.
तरी ही या डोळ्यातले हे
पाणी थांबत नव्हते.

मन माझे व्याकूळ होत होते.
ते मला तुझ्या मागे नेत होते.
विसाव्यास तुला थांबवल्या नंतर
रूप तुझे ते टोचीत होते.

वेळ आली तुला चीतेवर
सजवन्याची.
तुझ्या चीतेवर मला लाकूड
ठेवण्याची.

तुझे बाबा ही रडत होते.
तुझी आई ही ओरडत होती.
मला तू भेटणार नाहीस
आस ती सांगत होती.

जेव्हा तुला ते आग देत होते.
त्याच आगीत मन माझे जळत होते.
तुझ्या चीतेच्या त्या धुरात मला
चित्र तुझे दिसत होते.

आयुष्यात माझ्या दुःख भरत होते.
तुझ्या आठवणीचे आभाळ कोसळत होते.
तुला ही हे माहीत होते.
पण तुला ते सांगायचे नव्हते.
डोळ्यात माझ्या पाणी तुला आणायचे नव्हते.

                                  बबलु
                           9623567737