असा कसा जगाचा निरोप घेतला

Started by शितल, September 10, 2015, 07:33:16 PM

Previous topic - Next topic

शितल

असा कसा जगाचा निरोप घेतला
अखेरच्या भेटीसाठी श्वास तो रोखला
जळुनिया राख झाले मातीचे शरीर
कुणासाठी देहाने त्या जाळ तो सोसला?

आटापीटा  आईने त्या केली रे म्हणून
ऐटीत आज मिरवलास राजा रे होऊन
कष्टाने थकलेले बाबांचे हात बोले
खांद्यावर तुझ्या जायचे होते
तुलाच आज नेले .......

दादा-दादा बोलुनीया  थकेना ती ताई
दाराकडे एकटक वाट त्याची पाही
अडकलेला जीव तुझा सोडवून तू गेला
तुझ्या मागे आमचा तू विचार नाही केला

संपले ते अश्रू सारा संसार फाटला
कळाले रे आम्हां तू कायमचा गेला
जळूनिया राख झाले तुझे ते शरीर
कुणासाठी बाळा तू जाळ तो सोसला?


शितल ......


Ravi Padekar


शितल