शिव नाम कलयुग

Started by Dineshdada, September 11, 2015, 12:22:23 AM

Previous topic - Next topic

Dineshdada

शिव ॐ ॐ कारा,
नशिबाचा खेळ आहे सारा॥ध्रु॥
अंनंत हे रुप तुझे भव दुःख हारी
येतो रं रंक राव तुझीयाचं दारी
दुःखी दिन दुबळ्याचा तुच कैवारी
करीतो मी सेवा तुझी मन मंदिरी
हरी ॐ शंकरा, नशिबाचा खेळ आहे सारा॥1॥
जीथं तीथं आंन्यायाचा सुटलाया वारा
खोट्यां नाट्याचा हा झाला पसारा
माणसाला माणसाचा नाही रे सहारा
तुझ्या खोट्या भक्तिचा हा करतो ईशारा
हरी ॐ शंकरा, नशिबाचा खेळ आहे सारा॥2॥
पावसा पाण्याचा झाला रे मारा
गाय वासराला ईथ मिळणा रं चारा
पेरून बी बीयान सोण्याच्या तारा
येऊदे पावसाच्या नाजुक धारा
हरी ॐ शंकरा,नशीबाचा खेळ आहे सारा॥3॥
काळ्या धन दौलतीचा भरुनीया ढेरा
आईबापा फिरवीतो दुसर्याच्या दारा
आपल्या पोर बायकोचा करी उपास मारा
मनात पाप याच्या रंग गोरा गोरा
हरी ॐ शंकरा,नशीबाचा खेळ आहे सारा॥4॥

  कवी- दिनेश पलंगे
   7738271854