जीवन एक कोडं आहे

Started by yallappa.kokane, September 11, 2015, 12:32:05 AM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

जीवन एक कोडं आहे
अजूनही ते उलगडत नाही,
अर्ध आयुष्य जगलो तरी
उत्तर अजूनही सापडत नाही ।।१।।

कोणी सांगेल का मला
जगतो आहे आपण कशासाठी?
आयुष्य पूर्ण खर्ची करतो
फक्त लागणार्‍या पोटाच्या भुकेसाठी ।।२।।

कितीही असले सुख जीवनात
जगण्याची इच्छा संपत नाही,
विसंबून असणार्‍या कुटूंबासाठी
संपूर्ण आयुष्यही पुरत नाही ।।३।।

आनंदात जगण्यास केलेले प्रयत्न
क्षणात सारे फसवून जातात,
हवे असणारे कित्येक क्षण
नकळत हातातून निसटून जातात ।।४।।



यल्लप्पा सटवाजी कोकणे
०८ सप्टेंबर २०१५


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

harshali sarpotdar


का अशी घुसमट व्हावी
मनातल्या शब्दांची
आता भावनानाही सवय नाही
नजरेतून बोलण्याची.....!!!!