तुझ्यासवे तुझ्याविना

Started by Vedanti, September 11, 2015, 09:36:54 AM

Previous topic - Next topic

Vedanti

क्षणोक्षणी आठवण यावी तुझी
प्रत्येक स्वप्नात भेट व्हावी तुझी

तू दिसताच एकाएकी मन हरवावे
सहवासात तुझ्या भान हरपून जावे

आतुर तुझी एक झलक बघण्यासाठी
प्रतिक्षेत मी तुझ्या एका नजरेसाठी

तुझ्याविना अप्रकाशित हे तारे
तुझ्यासवे मनोरम्य जीवन सारे

वाटे लाभो सहवास तुझा जन्मान्तरी
व्हावा तुझा जीव माझ्याच अन्तरी

संगतीत तुझ्या फुलावी स्वप्न नवी 
गंध प्रेमाचा पुरवीत तुझीच साथ हवी


-वेदांती 
[url="http://vedantiagale.blogspot.com/"]Vedanti Agale Blogspot[/url]



Vedanti

[url="http://vedantiagale.blogspot.com/"]Vedanti Agale Blogspot[/url]