आठवणीत तुझ्या

Started by shailesh@26b, September 13, 2015, 05:08:18 PM

Previous topic - Next topic

shailesh@26b

अबोली तुझा हा चेहरा
जणू मोहरला मोगरा

आहे मी प्रेम दिवाना
घे समजून हा बहाना

सोबती तुझ्या मन बहरते
उनाड वाऱ्यावरती लहरते

वेळेचे भान ना उरते
आठवणीत मन हे झुरते

मधुर बोल तुझे ऐकावे
जाळ्यात शब्दांच्या गुंतून रहावे

आठवणींना मी असे जपावे
हरघडी मरुनही असे जगावे!

                    -शैलेश बोराटे
                      7718083311