दव थेंब

Started by शिवाजी सांगळे, September 13, 2015, 07:00:19 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दव थेंब...

पहाटेच्या दव थेंबाची
एकच कहाणी आहे,
धुक्यातुन जन्म एका
दुस-यात विरणे आहे!

पुन्हा नविन धुक्यात
थेंबाचे झुरणेच आहे,
अलगद पुष्प दलावरून
आत्महत्या करणे आहे!

घोंगावणा-या पावसात
अनिश्चेने वाहणे आहे,
जन्म आणि अपमृत्यु
हेच तर प्राक्तन आहे!


© शिवाजी सांगळे


©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९