प्रेम म्हणजे

Started by yallappa.kokane, September 14, 2015, 10:13:37 AM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

प्रेम म्हणजे नेमके काय आहे
जाणीव याची आता होत आहे,
दूर जरी गेलीस सोडून मजला
भास जवळ असण्याचा होत आहे ।।१।।

सहजच कविता सुचतात मला आता
प्रेमाच्या गावी दूर दूर हिंडताना,
रात्र अशीच नकळत निघून जाते
सहवासातले क्षण ते आठवताना ।।२।।

कसा मी व्यक्त करू सांग प्रिये
दडवून ठेवलेला भाव मी मनातला,
गेलीत उलटून कित्येक ती वर्षे
समजणार कधी अर्थ गाण्यातला ।।३।।


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ सप्टेंबर २०१५


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Shyamsunder

Driver म्हणजे काय.....??
Driver  म्हणजे फीरता वारा...

Driver  म्हणजे वाहता झरा...

Driver म्हणजे रात्री एकटाच अंधारात चमकनारा तारा...

Driver  अंगावरील शहारा...

Driver रात्रीचा पहारा...

फक्त Driver आहे सुख अन दु:खाचा सहारा...

Driver जन हिताचा नारा...

Driver आहे अनमोल हिरा...

Driver म्हणजे धाक अन् दरारा...

त्याचाच आहे वचक सारा...

काहीही करु शकतो Driver...
जर असेल तो नीतीनं खरा...

Driver  प्रेम करुन पहा....

एकदा तरी Driver वर प्रेम करुन पहा...

मनापासुन त्याच्यावर तुम्ही मरुन पहा...

               जीवाला जीव देईल तुमच्या
         त्याचा हात धरुन पहा...

              त्याचं नाव काळजावर
         एकदातरी कोरुन पहा...

कसा जगतो एकटा
तुम्ही चोरुन पहा...

प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा...

          त्याच्या सारख्या यातना
         एकदा तरी सोसुन पहा...

          अनोळखी जगात तुम्ही
           एकटे बसुन पहा...

दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा...

त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात ऊभे राहुन पहा...

         एकदा तरी Driver वर
          प्रेम करुन पहा...

          तो रोज मरतो तुम्ही
          एकदातरी मरुन पहा...

लेकरासाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा...

तुम्हाला काय वाटतं तुम्ही
Driver च्या यातना सोसुन पहा...

     एकदा तरी  Driver वर...
          तुम्ही प्रेम करुन पहा......!
                              शामसुंदर दहिफळे.नवी मुंबई कळंबोली

yallappa.kokane

यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर