रिकामी झोळी

Started by Shri_Mech, September 14, 2015, 01:32:16 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

रिकामी झोळी


निखळल्या सर्व तारा मनाच्या,
भंगूनी त्या बेसूर निनादल्या,
अवशेषही सर्वत्र विखुरले,
शोधुनही जे ना गवसले,

का मी तुटतो वारंवार अंतरी,
का माझ्याच बाबत ही वाटमारी,
का माझे यत्न पडती सदा अपुरे,
हाच सवाल माझा देवा तुला रे,

दाद मी कुणाशी मागावीच नको का ?
उजेड प्रकाशाचा कधी दिसणारच नाही का ?
दरबारी तुझ्या झाेळी रिकामीच राहणार का ?
अंत होण्यावाचून सुटकाच नाही का ?

Shri_Mech
Shri_Mech