पुन्हा तुझ्या प्रेमात पडायचं आहे

Started by Neha mhatre, September 14, 2015, 09:11:43 PM

Previous topic - Next topic

Neha mhatre

आज पुन्हा तुझ्या प्रेमात पडायचं आहे.................

हात तुझा हातात घेऊनी
समुद्र किनारी स्वैर फिरायचे आहे
त्याच पाण्यात पाय बुडवूनी
तासनतास बोलत राहायचे आहे
खरच, आज पुन्हा तुझ्या प्रेमात  पडायचं आहे..............

तुझ्या माझ्या संसाराची
स्वप्न रंगवायची आहेत
कामावरून थकून घरी येशील
तेव्हा पाण्याचा ग्लास पुढे करत
"खूप दमलास का रे शोना" म्हणून विचारायचं आहे
खरच, आज पुन्हा तुझ्या प्रेमात पडायचं आहे........

कुशीत शिरून तुझ्या
आपल्या प्रीतीचे किस्से गुणगुणायचे आहेत
आज पुन्हा पुन्हा तेच ते आपले प्रेमाचे
क्षण जगायचे आहेत
खरच, आज पुन्हा तुझ्या प्रेमात पडायचं आहे.........

स्वलिखित : नेहा म्हात्रे