नकळत माझ्या

Started by Neha mhatre, September 14, 2015, 09:20:14 PM

Previous topic - Next topic

Neha mhatre

नकळत माझा मी हरवत गेली
सोबतीत तुझ्या स्वतःला विसरत गेली.
मैत्रीच्या नात्यात हळुवार
प्रेमाची भर पडत गेली,
माझे मलाच कळले नाही
कधी मी तुझ्यात गुंतत गेली....

हसणाऱ्या तुझ्या चेहऱ्याने माझ्यावर
भोवळ पाडली तर होतीच,
पण क्षणाची उसंत न घेता
मनाने तुझाकडे धाव घेतलीच......

एकट्यात तुझ्या रुपाला मी
आठवू लागली नेहमी,
आपल्या मधील संवादाचे किस्से
आठवताच एकटीच हसू लागली....

लोकांच्या नजरेस जेव्हा आले माझे हे वागणे
त्यांनी तर मला ठार वेडी म्हणूनच पुकारले,
कळणार नव्हतेच त्यांना भाव माझ्या मनातले
वागणे या खुळ्या प्रेम वेडीचे .....................

स्वलिखित : नेहा म्हात्रे .