एक चांदण्या मनाला

Started by akhil, December 13, 2009, 11:19:00 AM

Previous topic - Next topic

akhil



एक चांदण्या मनाला होती चंद्रकोराची ग प्रीत,
चंद्रकोराच्या रुपाची अनोखी होती रीत...

रोज अनोखे रूप, रोज अनोखे लावण्य,
त्याच्यापुढे 'तिला' होते सारे – सारे नगण्य

त्याची पौर्णिमा झालेली त्याने भरून पहिली..
प्रकाशाची मळवट तिने माथिया लाविली..

रूप खालावत गेले, तसे काहूर दाटले,
एक 'सावित्रीचे' भाल असे पांढरे पडले

तरी प्रेमाची 'संगत' हर एक राती होती..
आता 'त्याचे-तिचे' प्रेम शत तारकांच्या ओठी...