‘त्या’ क्षणाचे जगणे

Started by akhil, December 13, 2009, 11:19:59 AM

Previous topic - Next topic

akhil

अळवावरून पडताना थेंबसुद्धा त्या क्षणाला अनेक युगे जगतो
'त्या' क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

चौकटीच्या इवल्याशा फटीतून कवडसा अंधारातून झगमगतो
'त्या' क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

नयनी अश्रू, ओठी हास्य, खेळ असा आननी रंगतो..
'त्या' क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

चंद्र-चांदण्या दिसती जेव्हा पुनवेचा दिन उगवतो..
"त्या' क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

nirmala.

अळवावरून पडताना थेंबसुद्धा त्या क्षणाला अनेक युगे जगतो
'त्या' क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..
sahi yar.........superb :)

gaurig

Mayoor