तुझे माझे नाते.......

Started by kavita.sudar15, September 16, 2015, 01:06:48 AM

Previous topic - Next topic

kavita.sudar15

तुझे माझे नाते काही असे असावे,
एकमेकांना न विचारता काही एकमेकांचे मन कळावे........
कधी मी रूसून बसावे,
   अन् तु प्रेमाने मला जवळ घ्यावे........
कधी तु ही माझ्यावर चिडावेस,
   पण माझ्या डोळ्यात पाहिल्यावर तु सारे काही विसरावेस.......
न सांगता मी, तु मला फोन करावास,
   कोणाचा नाही तु फक्त माझाच असावास........
मी नेहमी तुझ्या मेसेज ची आणि फोन ची वाट पाहते,
    तु ही तितक्याच आतुरतेने मला सारे काही  विचारावेस.......
समुद्र कीनारी चालताना तु हात माझा पकडावास,
   जास्त काही नको माझ्या सोबत फक्त तो रम्य क्षण तु पहावास..........
खूप आठवण जर आलीच माझी तुला,
  तर डोळे बंद करून आठवत जा मला.,
   नाहीच राहावले तर फोन करत जा मला........
फिल्मी म्हण मला किंवा अजुन काही,
  पण कधीतरी तुही फिल्मी होऊन मागणी घाल ना मला..........
जास्त काही नको मला,
  तुझेच सुख पाहिजे मला........
मनात जर कधी आलेच तुझ्या,
  वाटले काही द्यावेसे मला,
तर फक्त तुझे प्रेम आणि आयुष्यभराची साथ दे मला...........
तुझे माझे नाते काही असे असावे,
एकमेकांना न विचारता काही एकमेकांचे मन कळावे........!!!!@कविता@

arpita deshpande kulkarni

तुझे माझे नाते काही असे असावे,
एकमेकांना न विचारता काही एकमेकांचे मन कळावे........Lovely love poem