साद

Started by anuswami, September 16, 2015, 08:52:52 AM

Previous topic - Next topic

anuswami

साद

गर्द धुक्यातून वाट काढण
मला मुश्किल होत जाई
दूर नभाच्या पल्याड उभारून
नशीब माझ हाक देत जाई



हिरवळीची आस नव्हती कधी मज
तो सुगंधही त्यागला होता मी
होरपळणारा जीवच सोबती
काट्यांच्या वेदना बहू झेलल्या मी



घोंगावलेल वादळ डोक्यात
घर करून राहू पाहते कसे
पुसून जातील का कधीकाळी
घाव हृदयातील अन् तमठसे



ना रोखता येत कधी कधीच
वाहणाऱ्या त्या भ्रमरास काळाला
न्यूनगंड ना ठेवला कधी मी
तपस्या जाईल का पण फळाला?



मरणाची भीती तर हरएकाला असते
पण अपयशाच्या धुळीच काय?
यश मिळाल तर बहुत सुखी पण
त्यापुढ जाऊन अजून पाहिजे काय?



या जीवनात माहीत नाही नक्की
यश म्हणून माणसाला काय हवे असते?
माझ विज्ञान एवढंच सांगू शकत
त्याला पलीकडून येणारी साद हवी असते.....

कवी - अनिकेत स्वामी, अकलूज
asswami0143@gmail.com