बप्पा चे बोल आयका

Started by Dineshdada, September 18, 2015, 11:30:47 AM

Previous topic - Next topic

Dineshdada

श्री गणाधिपति गणपति माझे नाव!
कैलासाच्या शिखरावर छोटे माझे गाव!
वाटायचे मला घ्यावी दरवर्षी भूतलावर धाव!
भजन झाल बंद डॉल्बिच वाटतय मला भ्याव!
राहिली का खरी भक्ति असेल तर मला दाव!
काडुनी खोट्या वर्गन्या झाली सगळी साव!
लाज पण नाही वाटत म्हणता बप्पा मला पाव!
येतो माझ्या दर्शना साठी रंक कोणी राव!
लगेच म्हणत कोणी बारक्या त्याला पावती बुक दाव!
त्याच गरीबच्या पैशाने रात्रि रंगतों डाव!
मग काय!ज्याला लागतो डाव तोच म्हणतो अरे बप्पा ला अगरबत्ती लाव!
कसे सांगू कोणाला कीती काळजाला माझ्या लागतो घाव!
तुमिच सांगा ना कस मांडु आता भू तली ठाव!
आल्यावर सारखच वाटतय लवकरच निरोप घ्याव!
नाही कोणाची भक्ति नाही श्रद्धा,नाही राहिला कोणाच्या मनी भाव!
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,दिनेश पलंगे,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
             7738271854