दुष्काळाच्या झळा

Started by sagar dubhalkar, September 18, 2015, 06:19:19 PM

Previous topic - Next topic

sagar dubhalkar

  दुष्काळाच्या झळा

दुष्काळाच्या ह्या झळा
सोसू कश्या बाळा
लागूदे थोडा डोळा
अतातरी.

पायपीट खुप झाली
ही काया थकून गेली
कोणी राहिला ना वाली
आपल्याला.

पश्चात्ताप बहू केले
पण कोणी पहाया न आले
आता डोळे झाले ओले
बिनपाण्याचे.

आतातरी येऊद्यारे
येऊद्या थोडी माया
धरा शिरावर कोणी छाया
आतातरी.

कशी जिंदगी ही झाली
पोट पाठीला टेकली
का धरणीही लोपली
आमच्यासाठी

नको करू रे बाळा
असाआरडा ओरडा
गळा पडेल कोरडा
पाण्याविना.

- सागर दुभळकर
9604084846