घरी आला बाप्पा

Started by abhishek panchal, September 19, 2015, 01:11:52 PM

Previous topic - Next topic

abhishek panchal

घरी आला बाप्पा , जरा थकलेला दिसला
"दम खातो जरा" , म्हणून खुर्चीतच बसला
देव घरी आला , एक चमत्कारच घडला
पण त्याला असं पाहुन , जीव कोडयात पडला
दोन क्षण थांबून , म्हटला घाबरू नकोस असा
तुमच्या या गर्दीत , जीव होतो वेडा पिसा
बोट दाखवून मखराकडे , बाजूला ठेव म्हटला
हे असं ऐकून , माझा धीरच मग सुटला
काय करू आता , काही कळेनासे झाले
विचार करू लागलो , हे असे कसे झाले
रागावला का बाप्पा , कि आणखी काय झाले
नुसत्या विचारांनीच अशा , मला खुप रडु आले
डोळे पुसून माझे , बाप्पा हसू लागला जोरात
कळत नव्हते काही , नक्की काय चाललय घरात
याच प्रश्नाचं उत्तर , आज देतो मी तुला
असं बोलून बाप्पा , एकदम पुढ्यात मग आला
गंभीर केला चेहरा आणि बोलू लागला काही
" याच प्रश्नाच्ं उत्तर , नेमकं माझ्याकडे नाही
तुझ्या भल्यासाठी , हे घर तुला दिलं
अन् बंगला पाहुन कुणाचा , तुला दुःख झालं
खरं सुख तुझं , आता याच घरात आहे
सारं मिळून मग रोज , अशी आसवे का वाहे
हाच प्रश्न घेऊन , मी आज येथे आलोय
दुःखी पाहुन तुला , आज मीही दुखी झालोय
सुख कशात आहे , हे तूच मला सांग
मागण्यांची तुझ्या , आता लाव पुढे रांग
हे सारं घेऊन तुझी , भूक भागणार असेल
तर एका क्षणात सारं , हे तुझ्या पुढ्यात दिसेल
तूच एकटा नाहीस , ज्याची मती छोटी आहे
तुझ्यासारख्याच भक्तांची , इथे लिस्ट मोठी आहे
जे वर्षभर मला विसरून , चुका करत राहतात
मग ह्या दहा दिवसांची , वाट पाहत राहतात
बाप्पा येईल घरी , अन् माफ करेल मला
जाता जाता देऊन जाईल , आशीर्वाद भला
येण्याआधीच जाण्याची , जेव्हा तयारी मी बघतो
किती सांगू तुला , माणूस माझ्याशी कसा वागतो
तरी सारं काही विसरून , मी भेटाया येतो
अन् पाहुन दशा तुमची , मी दुखी खुप होतो
मग काही देण्यासाठी तुम्हा , मी हात पुढे करतो
पण स्पिकरच्या आवाजाने , माझे कानच मी धरतो
तुम्हा देऊ तरी कसे , आता तुम्हीच सांगा मला
माफ करा आता , माझा नाईलाज झाला
व्याख्या बदलून साऱ्या , तू सुख शोधत आहे
समाधान नाही कुठे , तू नुसता मागत राहे
सुखाच्या हव्यासापायी , तुला झोप लागत नाही
सारं काही घेऊन , तुझी भूक भागत नाही
माणसा सारखा व्यवहार , तुम्ही देवासोबत करता
दिमडीच्या स्वार्थासाठी , पुढ्यात चिरी मिरी ठेवता
जगाचा जो त्राता , त्याला तुम्ही काय देणार
देता जो खरा , तो कसा काय घेणार
श्रद्धेपेक्षा जास्त , माझी भीती तुम्हा फार
माझ्या श्रद्धेचा करता , अंधश्रद्धेने प्रसार
तुला जागं करू कसं , हे तर सोंग आहे तुझं
जर देव आहे मी , तर ऐकत का नाही माझं ? "

एवढं सारं बोलून , पुन्हा बाप्पा खाली बसला
व्यथा होत्या खुप , पार हताश तो दिसला
खाली घालून मान , आता बोलू लागला काही
"शरमने माझी मान , आता वर येणार नाही

श्रुष्टी केली मी , आणि तुझ्या स्वाधीन केली
सांभाळशील सारं , इतकी बुद्धी तुला दिली

पण मिरवु लागला तू , तुझ्या बुद्धीचीच ख्याती
बुद्धी दिली तुला , हि माझीच चुकी होती

बरेच होते इथे , पण वाचा तुला दिली
हवे तेच बोलशील , एवढी अपेक्षा मी केली

पण वाचेतून तुझ्या , आल्या वाईटच बाती
वाचा दिली तुला , हि माझीच चुकी होती

मन दिले तुला , व्यक्त होण्यासाठी
मुक्या त्या जीवांना , न्याय देण्यासाठी

पण मनाविरुद्ध यांचा , जीव सारे घेती
मन दिले तुला , हि माझीच चूकी होती "

निशब्द मी झालो , असे शब्द ऐकून त्याचे
काय होणार आता , या आपल्या जगाचे
त्याची एकमेव आशा , आता फोल ठरली होती
कळून चुकले मला , आपण खाल्ली आहे माती
माफ करा आम्हा , म्हणत पायापाशी गेलो
चूक करुन कबुल , नतमस्तक मी झालो
दयेचा तो सागर , त्याने लगेच माफ केलं
हात देऊन मला , पुन्हा उभ त्याने केलं
" मखरात नाही , मला जागा दे तू मनात
मंदिरात नको ,मला नेहमी ठेव ध्यानात
सुख नको शोधु , ते चराचरात आहे
बाहेर नको शोधु , मी तुझ्याच मनात आहे
भिऊ नको मला , मी राक्षस नाही आहे
आनंदेश्वर तू , सुख तुझ्या नसानसात वाहे
धर्म-जात-भाषा , हि फक्त ओळख आहे तुझी
माणुसकिने वाग , हिच शिकवण आहे माझी "
शहाणं करुन मला , बाप्पा दिसेनासा झाला
मखरात थाटाने , तो विराजमान झाला



                     - अभिषेक पांचाळ