का नको वाटते मी ?

Started by pavan kharat, September 19, 2015, 04:33:13 PM

Previous topic - Next topic

pavan kharat



का नको वाटते मी या निर्दयी जगाला,
मुलगी म्हणून जन्मले एवढाच माझा गुन्हा झाला !
वंशाचा दिवा मिळाला कि आनंद गगनात मावत नाही,
मग हा सर्व त्रास का गं माझ्याच नशिबाला !!

माझ्या डोळ्यात तरळणारी हि आसवे,
आई नेहमी तुझीच आठवण करत असतात !
तुला मी नको वाटत असली तरीही,
आई तुझ्याच श्वासात माझे श्वास असतात !!

तुझ्या कुशीमध्ये मला नेहमी प्रेमच मिळालं आहे,
तुझ्या डोळ्यातून मी सार निर्दयी जग पाहिलं आहे!
माझ्यासाठी दिलेला तुझा तो प्रत्येक हुंदका,
माझ्या काळजामध्ये मी कोरून ठेवला आहे !!

अडचणी माझ्या आयुष्यात नाहीत गं,
खरंतर माझं आयुष्याचं अडचणीचं आहे !
स्वप्न मी पण पहिली आहेत गं खूप,
तरी पण स्वत:च्याचं घरात मी परक्या सारखी राहिले आहे !!

अबोल जरी आहे माझं मन,
पण ते निर्जीव नाही गं !
घाव इतके खोलवर दिले आहेत सर्वांनी,
तूच सांग मला ते शांत कस राहील गं !!

सासर असेल किंवा असेल ते माझं माहेर,
दोन्ही मला सारखेच असतात ना !
जीव लावते  मी सर्वांनाच,
म्हणूनच सर्वच माझ्याशी क्रूरतेने वागतात का ?

लढेन मी सर्व संकटांशी,
गर्भातच नका गं संपवू  मला !
एक आशेची  किरण होऊन,
या सृष्टी वर तरी येऊ द्या मला !!
 
             पवन खरात - ९९२२७३००२९