वादळ मनाचे !

Started by श्री. प्रकाश साळवी, September 19, 2015, 09:29:03 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

वादळ मनाचे
हलके हलके वादळ मनाचे
मी शमवित असतो
विखरलेल्या मनाचे अवशेष
मी पुन्हा जमवित असतो
वाहती या भळभळत्या
जखमा मनाच्या
फुंकरीने जखमांना मनाच्या
मी अलगद रमवित असतो
हरवलेत किती शब्द हे
घायाळ मनाचे
एकेक करूनी ते
मी सारे कमवित असतो
पाहिले मी आहे ऊभारलेल्या
या जखमी मनाला
हळू हळू मी या
मनाला गमवित असतो
श्री.प्रकाश साळवी.