फक्त तू म्हणतेस म्हणून

Started by shrikant.pohare, September 21, 2015, 01:25:27 AM

Previous topic - Next topic

shrikant.pohare

फक्त तू म्हणतेस म्हणून........

जातोय माझा प्रेम पसारा आवरून
तुला त्रास नको मी घेईल स्वताला सावरून
माझ्या प्रेमासाठी नको तुझ्या भावनांचा खेळ
तुला जिंकून ही मिळणार नाही मला माझ प्रेम.

नको आता हा मनाचा आटापिटा
या प्रेमामध्ये आहे मी एकटा
तुझ प्रेम जिंकायला झटून
हरवतोय मी माझ्या वाटा.

असाच आहे तुझ्या मनी विचार माझा
दुनिये प्रमाणे तुही मांडला
निशब्द प्रेमाचा बाजार माझ्या
तूच साथ सोडली तर कोण करेल विचार माझा .

मीच चुकलो त्या वळण वरती
तहान मिटवण्याच्या आशेवरती
बांध बांदू पहिल्या त्या प्राहावा वरती
स्वप्न रुपी तिच्या प्रेमावरती .

जातोय मी विचार माझा करू नकोस
तुझ्या आयुष्यातील कठीण क्षणाला
आधर माझा घ्यायाल विसरू नकोस
दुख: तुझ मला वाटायला विसरू नकोस .


मी असाच वाटसरू चालत असेल
रस्ता चुकलेल्या वळणावरती
प्रेम तुझे अन स्वप्न तुझे
असतील माझे सखे सोबती .

फक्त तू म्हणतेस म्हणून..........                       
                           

                                      श्रीkant Pohare