वादळवाटा

Started by श्री. प्रकाश साळवी, September 22, 2015, 08:22:41 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

** ॥ वादळवाटा ॥ **
वास्तवाचे भुत घेऊनी वाट चालतो मी वादळाची
कितिही येवोत घोर संकटे मला ना पर्वा त्याची
विजेत्याचेच जग पाठीराखे साधा धिर ना पराजिताला
भ्रष्टाचारा मानमरातब अपमान सारा कुलवंताला
ठाऊक आहे मजला या जरी काटेरी वादळवाटा
निश्चयाच्या वल्ह्याने मी अडविन सागर लाटा
वाट चालता रक्ताळलो जरी मी कितिदातरी
तरीही चालत राहीन या वादळवाटा शतदा तरी
:श्री.प्रकाश साळवी.