भरलय आभाळ (लावणी)

Started by शिवाजी सांगळे, September 22, 2015, 08:28:10 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भरलय आभाळ (लावणी)

सर कशी आली बघा पावसाची
ओढ लावील तुम्हा माझ्या ज्वानीची।।धृ।।

भरलय आभाळ न् सुटलाय वारा
घायाळ करतोय हा मदनाचा मारा
कडाडेल बिजली, तेंव्हा मग इश्काची।।१।।

ओल्या पदरानी, चोळी माझी भिजली 
अावरावी कशी, मी जळती बिजली
सावरावं तुम्ही, शपथ तुम्हाला प्रेमाची।।२।।

भरलेत घट, बघा दोन्ही पाण्याने
जातील वाहुन, सांंभाळा जरा ध्यानाने
भिजूदेत काया, सारी तुमच्या कामाची।।३।।

थांबा तुम्हीं, इथचं माझ्या संगतीला
करा कोरडं, जळत्या ओल्या अंगाला
खेळु ओलंसुक, थांबेल सर पावसाची।।४।।

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Lyrics Swapnil Chatge


शिवाजी सांगळे

धन्यवाद ....स्वप्निल, लावणी लिहायचा माझा हा पहीलाच प्रयत्न आहे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Lyrics Swapnil Chatge

तरीही सुरेखच आहे ही पन..Nd All the Best for next Lavanyas .!

शिवाजी सांगळे

स्वप्निल, उत्साह वर्धक प्रतिक्रीये बद्ल पुन्हा एकदा आभार...
...सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९