अट्टाहास मनाचा

Started by विक्रांत, September 25, 2015, 06:25:55 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

अट्टाहास  मनाचा 
श्रेष्ठत्वाचा
अधिकाराचा   
जयजयकाराचा
जेव्हा पडतो
धुळीत कोलमडून
हास्यास्पद होवून
तेव्हा अहंकारची लत्करे
पिसाट भुते होवून
झपाटू लागतात
येणाऱ्या जाणाऱ्या
प्रत्येक सावलीस
मग सारे  रान 
चरकु लागते अन
दूरची वाट धरु लागते
मनातील भेगा
अधिकाधिक वाढतात
विखुरते  अस्तित्व
असंख्य तुकड्यात 
वाहतात   हातातून
जमवलेले  सुखाचे कण
हळूहळू  जाणिवेची
शक्ति घालवून
पड़ते बुद्धि गहाण
भासमान तरंगांना
उकिरड़ा  उपसणाऱ्या
अर्धवटागत
सुखाचा नवा मार्ग शोधून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/