ऐका हो माय बाप

Started by sanjay limbaji bansode, September 27, 2015, 08:23:25 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

सावलीचाही विटाळ होई
त्याला शिवणही होते पाप
मांग महारांची कहाणी सांगतो
ऐका हो माय बाप !!धृ !!

भुकेचे चटके वणवण भटके
मांगे भाकरीसाठी जोहार
हरवून भान काढितो घाण
तरी जुल्म अत्याचार
विखारी डंख मारती त्याला
मनुवादी ते साप
मांग महाराची कहाणी सांगतो
ऐका हो माय बाप !!1!!

पोरं उघडं ना बायकोला लुगडं
होता तोही उघडा नागडा
ना भेटी मेवा करी गावची सेवा
तरी गावाबाहेर त्याचा झोपडा
नव्हता खाया त्याशी दाणा
होतं दारिंद्र अमाप
मांग महाराची कहाणी सांगतो
ऐका हो माय बाप !!2!!

पोटभर खाई मजेत राही
सुखी त्यापेक्षाही प्राणी
गाठ दुखाशी राही उपाशी
प्यायलाही नव्हत पाणी
त्यांच्या जनावराचही पाणी
यांना पीने होतं पाप
मांग महाराची कहाणी सांगतो
ऐका हो माय बाप !!3!!

ना स्वरक्षण नव्हतं शिक्षण
माणूस असूनही दुर्दशा
अंधारी जिनं जनावरी राहणं
नव्हती उजेडाची आशा
उच्चवर्णी माजलेले सारे
होता त्यांचा यांना धाकं
मांग महाराची कहाणी सांगतो
ऐका हो माय बाप !!4!!

करण्या कार्य उगवला सूर्य
नाव त्यांचे आंबेडकर
माणूस केले हक्क त्यांना दिले
पळवला मनुवादी तो डर
आला नसता भीम आम्हां ताराया
असतो आजही आम्हीं गुलाम
मांग महाराची कहाणी सांगतो
ऐका हो माय बाप !!5!!

संजय बनसोडे -9819444028