नामर्दाची निशाणी

Started by sanjay limbaji bansode, September 29, 2015, 03:20:34 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

म्हैसीनी ढवळलेल्या त्या गढुळ ढवात
तुझ्या अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसणार तरी कसं

मूतखड्यागत अडकून राहिलेले तुझे ते स्वप्न
प्रत्यक्षात या दुनियेत येईल तरी कसं

जर अस्तित्वात आणायचे असेल तुला तुझी स्वप्न !
तर

अगोदर ती वैरण जाळून टाक
ज्या वैरणीची तु  एक एक पेंढी खाऊन
जबाबदारीची नाकात वेसण घालून
भीतीच्या खूट्याला मजबूरीच्या कासऱ्यानी  घट्ट बांधून
मुर्द्याच्या गोठ्यात अडकलास

हो मोकळा
वळू होऊन आपल्या स्वप्नासाठी धाव सैरावैरा
आणि आग लाव त्या गोठ्याला

कारण हा गोठाच तुझ्या नामर्दाची निशाणी आहे

संजय बनसोडे 9819444028