पितृपक्ष

Started by smadye, September 29, 2015, 03:28:08 PM

Previous topic - Next topic

smadye

 पितृपक्ष

श्रावणानंतर भाद्रपद येई
गंपू आला म्हणता गंपू जाई
पितृपंधरवडा मग येतो
दिवंगत वाडवडिलांचे आशीर्वाद घेण्याची संधी देतो

मग काऊची मज्जा होते   
पंचपक्वान्नांची मेजवानी मिळते
येरव्ही काऊची पाठवणी होते
या पंधरवड्यात त्याची मिन्नत्वारी होते

काय आहे अर्थ या पितृपक्षाचा'
खरच पितरांना आपण मन देतो कि करतो उपेक्षा
काय आहेत आपल्याकडून वाडवडिलांच्या अपेक्षा
त्यांचे सदगुण जोपासावे हि नसेल का त्यांची इच्छा

प्रसादाच्या नावाखाली असे हवे तसे हवे हा पिच्छा
खरच अर्थ कोणाला कळला का पितृपक्षाचा
खरे तर वाडवडीलांचे  आशीर्वाद घेण्याची देव देतो संधी
पण याच पितृपक्षाला अशुभ समजते आपुली बुद्धी

सौ सुप्रिया समीर मडये
madyesupriya@gmail.com