selfie

Started by jaydeshmukh2@gmail.com, September 29, 2015, 07:36:15 PM

Previous topic - Next topic

jaydeshmukh2@gmail.com

Selfie

चांदण्या सोबत चंद्र तुज्या ओंजळीत पाडायचा होता ,
तुझ्या सोबत आयुष्याचा selfie काढायचा होता,

रुसला असता चंद्र तर त्याला मनवलं असतं,
तुझ्या रुपाचं गुण गाऊन त्यालाही हीनवलं असतं,
त्याच रुपाचा प्रेमात चंद्रालाही पाडायचा होता,
तुझ्यासोबत आयुष्याचा selfie काढायचा होता

तुझा काळजीतला रुसवा अजुन मला आठवतो,
नकळत ओलावलेल्या पापण्यांमध्ये मी साठवतो
तुझ्या त्याच प्रेमाला आयुष्याचा नवा अंकुर फोडायचा होता
तुझ्यासोबत आयुष्याचा selfie काढायचा होता

संदेश घारे,विक्रोळी