व्यथा

Started by Dnyaneshwar Musale, September 29, 2015, 09:58:19 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

उभ्या पहाटे निघतो शेतात जाया
बोचतो रे  काटा त्याच्या अनवाणी पाया
साधंतो बांध घेउन फावडा खोरं
कधी शिकुण मोठ होणार माझ्या शेतकर्याची पोरं

दिस दिस सरकत जाई
काळजी त्याच्या जीवाला खाई
करपलेल्या रानालाच घालीत असे फेरया
कधी मोठा होनार हा शेतकर्याचा पोरया

गाय शेळ्या पाळुन करतो रे जोड धंदा
पाण्यावाचुन अवघड आहे रे हा फंदा
थेंब थेंब साठवुनी भरत नाही रे डेरं
कधी शिकणार माझ  शेतकर्याचे पोरं

कोरडाच वाहतो समदा वारा
तहान्या लेकरांचा जणु पोटाशी रे भारा
कर्जापोटी बॅंकेकडं घातलरे लई फेरं
कधी भाग्यवान होणारं माझ शेतकर्याच पोरं


कधी पिकला माल पण नाही त्याला बाजार
इथं चिटकला जणु त्याला भ्रष्टाचाराचा आजार
समदेच ईथे झाले रे लई चोरं
कधी शिकुन मोठं  होणार माझ शेतकर्याच पोरं.