* मनाप्रमाणे *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 29, 2015, 10:54:44 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* मनाप्रमाणे *
आज मनासारखे वागायचे होते
तुझ्याजवळ मला यायचे होते
माझे प्रेम तुला दाखवायचे होते
प्रेमाच्या दुनियेत तुला न्यायचे होते

जिथे स्वर्गसुखही अपुरे वाटते
इतके तुला सुखवायचे होते
तुझा पदर ही अपुरा पडेल
इतके तारे त्यांत टाकायचे होते

तुला आवरता आले नसते
एवढे प्रेमाचे खजिने लुटवायचे होते
संपुन संपवता आले नसते
असे घट्ट नाते जोडायचे होते

पण तुझ्या एका जवळ-दुर
शब्दाने मला किती दुर केले होते
स्वताच स्वताला मन सांगत होते
मनाप्रमाणे इथे वागता येत नसते.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938