शेतकरी

Started by sanjay limbaji bansode, September 30, 2015, 08:48:33 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

एक शेतकरी
पडलाय कोलमडून
दुःखाच्या पुरात
शोधतोय आपला
विस्कटलेला संसार !

सतत त्यावर आदळणाऱ्या
त्या दुष्काळी लाटा
आणि खिळखिळ झालेल्या त्याच्या स्वप्नाच्या वाट.
कधीही पडतील
कोलमडून जमिनीवर .
त्यानीच वळलेल्या दोरीत
त्याचा देह
अडकलेला असेल
झाडावर.
उंबरातल्या किड्यासारखे
तो
दुखात अडकून पडला .
जाळ्यात अडकलेल्या
मासळी सारखी
त्याची गत झाली .
पाण्यात आहे
पण आजादी नाही !

जाळ
कधीही वर येईल
आणी
त्यातच तडफडुन
प्राण जाईल .

एका सरलेल्या तेलाच्या दिव्यासारखा
तो जळत होता
जशी जशी
वात राख होत होती
तसे तसे
त्याचे अस्तित्व
कमी होत होते .

तरीही तो
हसत होता,
ढगा सोबत भांडत होता
त्याला बोलत होता
तूच हारणार
आणी मी जितणार  .

...तो फार जिद्दी होता
कारण तो एक
शेतकरी होता !
शेतकरी होता !

संजय बनसोडे 9819444028