गुलाबाच्या फुला...

Started by Ravi Padekar, October 01, 2015, 02:27:25 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

तुझ्या मागं मागं फिरूनी
झालाय जीव खुळा
आता तरी बोल माझ्या गुलाबाच्या फुला...

गुलाबाच्या फुलावानी तुझा रंग लाल गाल
उमळलेल्या ओठांची पाकळ्यांवानी हाल
माझ्यावरच्या रागाचा त्रास होतो का मनाला
आता तरी बोल माझ्या गुलाबाच्या फुला...

हातात हात घेउनी, नेईन तुला तीरावर
आता तरी येईल का हसू तुझ चेहर्‍यावर
आवडेल तुला यायला सांगशील का तू मला
आता तरी बोल माझ्या गुलाबाच्या फुला...

नको असा हट्ट तुझा नाकाच्या देठावर
शब्द मुके झाले का तुझे त्या ओठांवर
गप्प गप्प राहुनी काय हवे आहे तुला
आता तरी बोल माझ्या गुलाबाच्या फुला...

होशील का तयार माझ्या सोबत चालण्याला
देशील का तुझी साथ दुख असले तरी संगतीला
तुझ्यासाठीच झाला आहे जीव हा खुळा
आता तरी बोल माझ्या गुलाबाच्या फुला...

                                                                   कवि:- रवी  पाडेकर
                                                                   मो.- 8454843034.