जागा द्याना दारी....

Started by yogesh desale, October 03, 2015, 03:35:44 PM

Previous topic - Next topic

yogesh desale


     
      - योगेश देसले
     ( 9967682021 )
कधीच नाही मने भेटली,
कधी विटाळ न स्पर्शाची मिटली,
आम्हास तरी न लाजं वाटली,
जरी असली मान छाटली ।

कधी देव पोरका पाहण्यासी,
कथी ओठ कोरडे पाण्यासी,
जाग आली ना चवदार तळ्यासी,
ना गाभारातल्या पाखंडासी ।

कधी शिक्षणाचा घालून जागरं,
कधी योजनांचा वाढला वावरं,
तरी न भरली मनाची घागरं,
फिरत राहीला रुढींचा नांगरं ।

कधी वेशीसी पडलो नागडा,
कधी आधार बने उकिरडा,
तरी गावं न आला भाबडा,
आपुलकीचा नुसता ओरडा ।

कधी महापुरूषांनी दिला आवाज,
कधी धरला एकीचा बाज,
तरी न भेटे माणुसकीचा साज,
पेटुन ऊठलो म्हणूनी आज ।

कधी दिवाळी अंधारात साजरी,
कधी डोळ्यात न पाणी आवरी,
तरी पूर्ण हो केली वारी,
आतातरी जागा द्याना दारी ।