परतीचा पाऊस...

Started by शिवाजी सांगळे, October 03, 2015, 07:23:59 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

परतीचा पाऊस...

खरा तर मी भाद्रपदातला
कुणी म्हणे मला परतीचा,
गडगडाटाने मुद्दाम आलो
ठेउन मान तुमच्या प्रेमाचा !

मधल्या काळात रूसलो
आभाळातच लपुन बसलो,
चिडले सगळेच माझ्यावर
म्हणुन जाता जाता बरसलो !

पाहुन हिरवी चादर भुईवर
मन कस मग भरून येतं,
तोडू नका हो झाडं तुम्ही
मग मलाही बरसावं वाटतं !

दयाल वचन मला तुम्ही
वसुंधरा ठेवणार हिरवीगार?
ठेवुन लोभ तुम्हावर असाच
पुढल्या वर्षी परत येणार !

चार महिने पुरे झालेत
तुमच्याकडे गावी येउन,
रामराम स्विकारा माझा
चाललो मी परत निघुन!

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

yadav dhone

खुपच छान परतीचा पाऊस...योग्य वेळी कविता वाचणात आली.त्यामुळे कविता खुपच आवडली.

शिवाजी सांगळे

तत्परने प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनस्वी आभार यादव ढोणेजी...
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९