माझं रूदन...!

Started by शिवाजी सांगळे, October 04, 2015, 12:17:40 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

माझं रूदन...!

काल पाहीलं मी
हुंदके देत त्याला रडतांना
जेव्हा माझा खिसा
ओला झाला होता...?

विचारलं मी कारे बाबा,
काय झाल रडायला?

क्षीण आवाजात म्हणाला...

जीव गुदमरतोय रे...
माझा इथ मेल्या नंतर सुद्धा

मला समजलं नाही !
आम्ही तर सर्व
तुझ्याच नावावर केलयं
चौक, नगर, अगदी
गल्ली पासुन ते दिल्ली पर्यंत.."
अनेक योजना सुद्धा!

हां... मात्र एक खरं
याचा फायदा तुला नाहीच,
ज्याच्यां साठी केल्या
त्यांना पण नाहीच!

सोडा तुम्ही माझं रडगाणं
मी तर गेलो मरून तत्वांसोबत,
तुम्हाला जगायचयं
नव विचारांच्या जगा सोबत!

आम्ही केला होता साधा वाद,
तरीही साधला होता संवाद,
तुम्हाला समोर जायचयं
आ वासुन आहे आतंक वाद!

आता तरी सोडा...
जाती धर्माचं राजकारण,
एकात्मतेने जगा, जगवा
तेंव्हाच थांबेल माझं रूदन!

हे राम, हे राम, हे राम...

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९