नाती

Started by sneha kukade, October 04, 2015, 03:25:51 PM

Previous topic - Next topic

sneha kukade

आयुष्याचा प्रत्येक पावलांची साथ
म्हणजे  नाती !

ना ती ना मी पण  श्वासातला
श्वास  म्हणजे  नाती !

कळालेच तर उघडल्या पुस्तका प्रमाणे नाही  तर  कधी न  सुटणा-रा कोड्यांप्रमाणे  अवघड असतात  हि  नाती !

कधी ग्रीष्मातल्या  वाऱ्या प्रमाणे  सुखावणारी
तर कधी रणरणत्या उन्हा प्रमाणे
दुःखावणारी असतात  ही नाती !

देवाऱ्यातल्या माळी प्रमाणे  नाही
तर  शिम्प्ल्यातील मोत्या प्रमाणे
जपावी लगतात ही  नाती !

बोबडया मनु  चे  बोबडी बोल
जसं  समाजाव तशी समजावी
लागतात  ही नाती !

कधी  गोड कधी तीखट
पण सगळ्यांना आपलस
करणारी  असतात ही नाती !