माणूस झालो आज आम्हीं

Started by sanjay limbaji bansode, October 04, 2015, 11:01:36 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

उखाडली आमची मूळे
जरी केले आम्हां लुळे
अरे झालो पुन्हां माणूस
आम्ही तरलो भीमामुळे !!धृ!!

एकलव्याचा अंगठा कापिला
होता शूद्र म्हणूनी
तपश्या केली शंबुकानी
त्यास धाडिलें यम सदनी
बघता आमुचा इतिहास तो
अंग अंग शहारे !!१!!

नरसंहार केला भिक्षुचा
त्या पुष्पमित्र सुंगाने
शूद्रतिशुद्रांना रोखीले पुन्हां
त्या ब्राह्मणी सत्तेने
स्त्री जात घरात कोंडल्या गेली
त्या मनुस्मृतीमुळे !!२!!

कमरेला झाडू गळ्यात मडके
होता पेशवाईचा तो काळ
पड़ता सावली मारती त्यांना
बनला काळ तो कर्दनकाळ
विद्याग्रहण जरी केली शुद्राने
काढती त्यांचे डोळे !!३!!

दहन केले मनुस्मृतीचे
आग लावली चवदार तळ्या
हक्कासाठी झटून त्यांच्या
नवदृष्टि दिली आंधळ्या
बघून शुद्राची नवक्रांती ती
मनुवादी तो जळे !!४!!

एक जाहले अन्याय कळाले
सूर्य उगवला घरोघर
अन्यायाला त्या वाचा फुटली
सळसळे रक्तात आंबेडकर
मेलेले मुर्दे जागे झाले
त्या भीम संघर्षामुळे !!५!!

रमाबाई नगर असो खैरलाजी
या असो जवखेडा हत्याकांड
दर्शन झाले एकीचे आमुच्या
ठेचले जातीवाद्याचे तोंड
आत्मसम्मान पुन्हां जागला
अन्याय साऱ्या कळे
अरे झालो पुन्हां माणूस
आम्ही तरलो भीमामुळे !!६!!

संजय बनसोडे -9819444028