गुरू(दादासाहेब)

Started by Dineshdada, October 05, 2015, 01:00:13 PM

Previous topic - Next topic

Dineshdada

सुखा नाही कोणी देव
त्याला माणसाच भेव
मुखात वेड्या सदैव
गुरुचे नाम अखंड ठेव

गुरु वीना नाही मार्ग
त्याच्या चरणी आहे स्वर्ग
काना मात्रा तोची दिर्ग
अध्यात्मकाचा आहे तोचि एक वर्ग

त्यांचे करता स्मरण
होईल दुःखाचे हरण
त्यांचे घेता दर्शण
जाशील भवसागर तरुण

गुरु ती प्रेमळ काया
शिष्या वर सदा कृपेची छाया 
जीवा पाड आपल्या भवती
असे त्याची केविलवानी माया

सद्गुरु ला मनी स्मरून
जरी आले संकट धाउन
मनी विश्वास धरून
भवसागर ही जाशील तरुन

गुरु मोक्षाची पायरी
असावा मन मंदिरी
देव शोभतो देव्हारी
गुरु असे रुदयान्तरि

गरू असे प्रेमाचा झरा
चुकवि जन्मा मरनाचा फेरा
न्हेंई आपणास मोक्षाच्या दारा
गुरुर्ब्रह्मा गुरुर विष्णु गुरु देवो महेश्वरा

नाही हा गुरु मार्ग सोपा
तोडा नाही गुरुच्या कोपा
सांगतो तुम्हा माय बापा
विश्वास असो गुरु चरणी
श्रद्धेची माळ मनी गोपा

🙏 रचनाकार🙏
    दिनेश पलंगे
7738271854