रंग भाव...

Started by शिवाजी सांगळे, October 05, 2015, 01:38:43 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

रंग भाव...

काही तरी, कुठेतरी
बिनसलं आहे,
लिहितो त्या शब्दातलं
चित्र हरवलं आहे !

लिहायचो आधी...
अक्षरांतुन भाव दिसायचे,
लिहीता लिहीता
शब्दांना रंग फुटायचे!

झालेत का गहिरे
सारे रंगच जीवनाचे?
कि उरलेच नाही
भाव कुणा समजण्याचे?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९