विरलेली स्वप्ने

Started by Csushant, October 07, 2015, 02:22:11 AM

Previous topic - Next topic

Csushant

गोष्ट एका राजकन्येची,
किलकिल्या नजरेत तिच्या स्वप्नांची मांदियाळी!
बिलगून माळा त्या स्वप्नांच्या उराशी,
करे संचार मुक्त आपल्याच रम्यलोकी!
पण राणीचा हट्ट का राजाची हौसच  नडली,
उमलण्या आधीच ती कोवळी कळी कुस्करली!
राजकन्या तर काळाच्या ओघात हरपली,
उलगडले ना एक गूढ़ तरी,
त्या निष्पाप मनाची स्वप्ने कुठे बरे विरली!