==* कसे रंग आले बहरुनी आता *==

Started by SHASHIKANT SHANDILE, October 07, 2015, 02:39:19 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

कसे रंग आले---------------------

कसे रंग आले बहरुनी आता
मनी दाटला प्रेमवारा सुखाचा
तुझे ओठ ओले अबोले न बोले
कसा ऐकू मी शब्द तुझ्या मनाचा

कसे रंग आले---------------------

हरवूनि मी गेलो बघता तुला गं
मला भान कसले आता न रहाले
हसावे जगावे तुझ्या संगतीने
तुझविन माझे बेअर्थी हे जगने

कसे रंग आले---------------------

जाऊ कुठे मी करमेना कशातं
बाहुत तुझ्या या सदा मी रहावं
स्वप्न बघावं तुझ्या संगतीचा
तुझ्या संगतीने जीवन जगावं

कसे रंग आले---------------------

जवळ ये अशी तू बाहुत माझ्या
मला लाजने हे बरोबर नाही
कशाला हवा हा आता दुरावा
प्रिये ये जवळ तू आणि बोल काहि

कसे रंग आले बहरुनी आता
मनी दाटला प्रेमवारा सुखाचा
तुझे ओठ ओले अबोले न बोले
कसा ऐकू मी शब्द तुझ्या मनाचा
-----------****-----------
शशिकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी - ९९७५९९५४५०
दि.07-१०-२०१५
Its Just My Word's

शब्द माझे!


SHASHIKANT SHANDILE

Its Just My Word's

शब्द माझे!