कुणी असं प्रेम करत असेल...

Started by Ravi Padekar, October 07, 2015, 03:46:46 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

मला नाही वाटत आज काल
कुणी असं प्रेम करत असेल
प्रेम व्यक्त करायला ही,
कुणी आता चिट्टी पाठवत असेल

तिच्या प्रेमासाठी, 
आता कुणी कविता बनवत असेल
तिच्या केसात माळायला
कुणी आता गजरा आणत असेल
मला नाही वाटत आज काल
कुणी असं प्रेम करत असेल

फूल कोमेजलेल असल तरीही,
जिवापाड तो जपत असेल...
वाद निर्माण झाला तरीही,
समजून एखादा घेत असेल...
मला नाही वाटत आज काल
कुणी असं प्रेम करत असेल

चुकून कुणाशी बोलली तरीही
संशय त्याच्या मनात नसेल...
तिच्या बद्दलचा राग कधी
त्याच्या मनी ध्यानात नसेल
मला नाही वाटत आज काल
कुणी असं प्रेम करत असेल

पैशाने तिला जिंकण्यापेक्षा,
प्रेमाने तिचे मन जिंकत असेल
स्वप्न तिला दाखवण्यापेक्षा,
अस्तिवात तो आणत असेल
मला नाही वाटत आज काल
कुणी असं प्रेम करत असेल

त्याला पाऊस आवडतो म्हणून,
ती ही पावसात भिजत असेल,
स्वप्न त्याचे पाहण्यासाठी,
त्याच्याच कुशीत निजत असेल
मला नाही वाटत आज काल
कुणी असं प्रेम करत असेल...
   
                               कवि:- रवी पाडेकर (मो.8454843034)
                                        मुंबई,घाटकोपर.


Ravi Padekar