तो रंग प्रीतीचा होता

Started by sameer3971, October 08, 2015, 02:49:33 PM

Previous topic - Next topic

sameer3971

ओठांवर थरथर होती
होती गालावरची खळी
मिटलेल्या डोळ्यात जो
होता तो
रंग प्रीतीचा होता

बहुत तुझ्या होता
होता मिठीत तुझ्या
बंद पाकळ्यात जो
होता तो
रंग खुलवीत होता

नसानसातून होती
होती देहात माझ्या
तुझ्या स्पर्शात जो
होता तो
रंग रोमांचित होता

अजून भारावलेला होता
होता गंधाळलेला
उधळला तुझ्यावर जो
होता तो
रंग गंधित होता

कंपित श्वास होता
होता कातर शब्द
निशब्द ऐकला जो
होता तो
रंग ओळखीचा होता

समीर बापट
मालाड, मुंबई.